Type Here to Get Search Results !

वेंगुर्ल्यात परिवर्तन पॅनेलचा विजय

मच्छीमार सहकारी संस्था निवडणूक : वेंगुर्त्यात परिवर्तन पॅनेलचा विजय

🟪 प्रतिस्पर्धी पॅनेलचा एकच उमेदवार विजयी

वेंगुर्ले/ प्रतिनिधी 

धी वेंगुर्ले मच्छीमार सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळविला. सलग चारवेळा परिवर्तन पॅनेलने या संस्थेवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे.

धी वेंगुर्ला मच्छीमार सहकारी संस्थेची सन २०२४-२५ ते २८-२९ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी संस्थेच्या १५ सदस्यांसाठीची निवडणूक रविवारी झाली. यात परिवर्तन पॅनेल व मानसीश्वर पॅनेल आणि अपक्ष उमेदवारांनी सहभाग घेतला होता. मत मोजणीत क्रियाशील सर्वसाधारण सभासद प्रतिनीधी मतदारसंघातून वसंत महादेव तांडेल (३४७), प्रकाश दत्ताराम मोठे (३४४), नीलेश काशिनाथ खडपकर (३४२), आनंद रामचंद्र वेंगुर्लेकर विनायक भरत केळूसकर (३३३), मनोहर रामचंद्र तांडेल (३२६), मनोज चंद्रकांत कुबल (३२४), तर मानसीश्वर पॅनेलमधील आगोस्तीन सिमाव फर्नांडिस (२७९), भूषण भगवान कोचरेकर (२४४), राजेंद्र दत्ताराम कुबल (१७५), राजाराम पुरूषोत्तम मालवणकर (२५७)

भूषण अजित नाईक (२६८), निकेश नितीन नांदोस्कर (२५५), सुरेश मनोहर तांडेल (२४०), चंद्रशेखर, रामकृष्ण तोरस्कर (२३५), चंद्रशेखर संभाजी येरागी (२५४) व अपक्ष उमेदवार राजेंद्र दत्ताराम कुबल (१७५) यांना अशी मते मिळाली. महिला प्रतिनीधी मतदार संघातून परिवर्तन पॅनेलची आयेशा गुरूदास हुले मानसीश्वर पॅनेलची एकमेव उमेदवार (३६३) विजयी झाली. मात्र या मतदार संघातील मानसीश्वर पॅनेलच्या उमेदवार सोनिया अमोल वरसकर (२९०) व अपक्ष उमेदवार संचिता शरद गिरप (२०१) यांना अशी मते मिळून पराभवास सामोरे जावे लागले. इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून परिवर्तन पॅनतेलचे अनंत वासुदेव केळुसकर (४५८) हे विजयी झाले तर प्रतिस्पर्धी मानसीश्वर पॅनेलचे रामचंद्र कमलाकांत भोगवेकर यांना (३१८) मते मिळाली. आणि भटक्या जाती-जमाती विशेष प्रवर्ग मतदार संघातून महेश रामचंद्र मोरजे (४७९) हे परिवर्तन पॅनेलचे उमेदवार विजयी झाले तर मानसीश्वर पॅनेलचे (३०६) मते मिळाली. दरम्यान, या निवडणुकीत गेली ५ वर्षे चेअरमन पद भूषविलेले राजेंद्र दत्ताराम कुबल हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणूक अधिकारी म्हणून प्रशांत साळगांवकर यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments