Type Here to Get Search Results !

वेंगुर्ल्यात व्यश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई

पोलिस निरिक्षक अतुल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव व पोलिस कर्मचाऱ्यांची कारवाई 

योगेश तांडेल / वेंगुर्ले 
वेंगुर्ला बंदर नजीक असलेल्या वामन गेस्ट हाऊस येथे छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अनधिकृत वेश्या व्यवसायावर वेंगुर्ला पोलिसांनी सापळा रचत सोमवारी दुपारी धाड टाकली. या धाडीमध्ये एका २५ वर्षीय युवती सहित वेंगुर्ला पिराचा दर्गा येथील अश्रफ इसाक मुजावर (४७) याला वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेऊन भा. द. वि. क. ३७० सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेंगुर्ला बंदर येथील वामन गेस्ट हाऊस मध्ये छुप्या पद्धतीने वारंवार एक किंवा दोन युवतींना आणून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती वेंगुर्ला पोलिसांना मिळाली होती. यानुसार आज १५ जानेवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या सहित वेंगुर्ला पोलिसांच्या टीमने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वामन गेस्ट हाऊस वर अचानक धाड टाकली. यात मुंबई येथील २५ वर्षीय युवती सहित हा वेश्या व्यवसाय चालवणारा अश्रफ मुजावर सापडला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान मुंबई येथील युवतीची वैद्यकीय तपासणी करून तिला सावंतवाडी येथील अंकुर सुधारगृहात रवाना करण्यात आले असून अश्रम मुजावर याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, पोलीस रंजीता चौहान, सुरेश पाटील, अमर कांडर, पांडुरंग खडपकर, बंटी सावंत, योगेश सराफदार, दादा परब, योगेश वेंगुर्लेकर यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव करीत आहेत.
आजगाव येथील वेश्या व्यवसायावर धाड टाकल्यानंतर वेंगुर्ला पोलिसांची ही दुसरी धडक कारवाई केली आहे. यामुळे अनधिकृत वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Post a Comment

0 Comments